सोलापूर: बॉयलर कोसळला; 2 कामगार ठार?

येथे उभारण्यात येत असलेल्या नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या (एनटीपीसी) प्रकल्पात बॉयलर कोसळून 2 कामगार ठार झाले आहेत. या घटनेत अन्‍य एक कामगार जखमी झाला असून त्‍याला उपचारासाठी हलविण्‍यात आले आहे.
 सोलारपासूननजीक एनटीपीसीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामध्ये आज बॉयलर बसवण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना एक लोखंडी रॉड कोसळून जवळपास १० कामगार त्या खाली सापडले. यातील काही जखमी कामगारांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. तर 2 कामगार जागीच ठार झाले असल्याचे समजते.
 जिल्हा पोलिस प्रमुख विरेश प्रभु घटनास्थळी पोहचले आहेत. पुढील तपास आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे.
एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांनी मृतांबद्दल माहिती दिलेली नाही. काही कर्मचारी जखमी असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *