पोरबंदर येथे स्फोटाचा तो आवाज फटाक्यांचा

गुजरातच्या पोरबंदर येथील नौदल तळाजवळ शुक्रवारी सकाळी स्फोटाचे मोठे आवाज ऐकू येताच नागरीकांमध्ये एकच भितीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळाने नौदलाने हा फटाक्यांचा आवाज असल्याचे स्पष्ट केले.
 गुजरात, दिल्ली या राज्यांमध्ये आधीच सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. काश्मिरमार्गे दहशतवादी शहरात प्रवेश करु शकतात असा इशारा गुप्तचरयंत्रणांनी दिला आहे.
 भारतीय सैन्याने मागच्या आठवडयात पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून यशस्वी सर्जिकल स्ट्राईक्स केल्यानंतर तिन्ही सैन्य दलांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पंजाब, जम्मू-काश्मिर सीमेजवळची गावे रिकामी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *