फ्लोरिडाला वादळाचा तडाखा; हैतीत ३०० ठार

    फ्लोरिडाला वादळाचा तडाखा; हैतीत ३०० ठार

         अमेरिकेतील दशकभरातील सर्वात वेगवान आणि विध्वंसकारी चक्रीवादळ ‘हरिकेन मॅथ्यु’ फ्लोरिडात धडकले असून तेथील प्रशासनाने नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले आहे. या वादळामुळे हैती देशात ३०० ठार झाले आहेत. फ्लोरिडातील १.५ दशलक्ष नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सांगितले आहे.
 हैती हा उत्तर अमेरिकेतील देश असून तेथे या चक्रीवादळाने हाहाकार उडाला आहे. येथे ३०० च्या आसपास नागरिक ठार झाले आहेत. अमेरिकेने येथे मदत कार्यासाठी ९ लष्करी हेलिकॉप्टर पाठवले आहेत. हैतीमध्ये जवळपास साडे तीन लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. फ्लोरिडाचे गर्व्हनर रिक स्कॉट यांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच आवाहन केले आहे. येथे पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
 हे वादळ ग्रेड ४चे असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अमेरिकेतील गेल्या दशकातील सर्वात विध्वंसकारी वादळ म्हणून या वादळाची नोंद करण्यात आली आहे. जॉर्जिया आणि कारोलिनास येथे ही या वादळाचा फटका बसणार आहे. हे वादळ ताशी १४० किलोमीटर पेक्षा अधिक वेगाने फ्लोरिडाकडे सरकले आहे.  राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी फ्लोरिडा, दक्षिण कॅलोरिना येथे आणिबाणी जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *