गेल्या काही दिवसापूर्वी गुजरात मधील पोरबंदरजवळ समुद्रात भारतीय तटरक्षक दलाने एक पाकिस्तानी बोट ताब्यात घेतली होती. या घटनेनंतर आज पुन्हा गुजरात मधील कच्छ येथे खाडी क्षेत्रात ‘बीएसएफ’च्या जवानांनी आणखीन एक संशयास्पद बोट ताब्यात घेतली आहे. त्या बोटीत एकूण ९ पाकिस्तानी नागरिक होते. त्या सगळ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, या बोटीमध्ये कोणत्याही प्रकारचे शस्त्रे अथवा शस्त्रसदृश साहित्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. ही बोट भारतीय क्षेत्रात नेमकी कशी आली, ती चुकून आली आहे का? की, यापाठीमागे पाकिस्तानचे काही षडयंत्र आहे. याचा अधिक तपास पोलीस करित आहेत.
गुजरात; पुन्हा पाकची संशयास्पद बोट
