उरी दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात असताना बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरींनी मात्र शहिदांचा अपमान केला आहे. एका वृत्त वाहिनीने विचारम्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ‘त्यांना सैन्यात जायला आम्ही सांगितले होते का ? त्यांना शस्त्र उचलण्यास कोणी सांगितले ?’ असे वादग्रस्त प्रश्न विचारले. त्यामुळे त्यांच्यावर सोशल मिडियातून टीका होत आहे.
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर चित्रपट निर्माता संघटनेने पाकिस्तानी अभिनेत्यांवर बंदी घातली. याविषयी ओम पुरी यांना एका वृत्तवाहिनी प्रश्न विचारला असता त्यांनी संतापजनक व्यक्तव्य केले.
पाकिस्तानी कलाकारांनी भारतात अवैध प्रवेश केलेला नाही, ते व्हिसा घेऊन भारतात आले आहेत, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेतली. त्यांना भारताचे जवान शहीद होत असतांना तुम्ही पाकिस्तानची बाजू कशी घेता असे विचारण्यात आल्यानंतर त्यांनी उलट प्रश्न करत शहीदांचा अपमान केला.
‘जवानांना सैन्यात जायला जबरदस्ती केली होती का ? त्यांना शस्त्र उचलण्यास कोणी सांगितले? असे उलट सवाल केले. त्यांचा पारा जास्तच चढला आणि ते पुढे म्हणाले की, ‘ १५ ते २० लोकांचे आत्मघाती पथक तयार करा आणि पाकिस्तानला पाठवून स्फोट घडवून आणा.’ ओम पुरींच्या या वक्तव्यामुळे सोशल मिडियातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
दरम्यान, सलमान खान, करण जोहर, शाहरुख खान यांनी देखील पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेतली होती. त्यानंतर आता ओम पुरी यांना पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलेला आहे.