लुधियाना : झेलम एक्‍सप्रेसचे ९ डबे घसरले

जम्‍मूहून पुण्‍याकडे येणार्‍या झेलम एक्‍सप्रेसचे ९ डबे रुळावरुन घसरल्‍याने प्रवाशांमध्‍ये भीतीचे वातावरण होते. ही घटना आज पहाटे लुधियानावळ घडली आहे. या घटनेत चार प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना सरकारी रुग्‍णालयात हलवण्‍यात आले आहे. २ किमी. अंतरावरील रेल्‍वे रूळ उखडल्‍याने या मार्गावरील चार एक्‍सप्रेस रेल्‍वे गाड्या रद्‍द करण्‍यात आल्‍या आहेत.
याबाबत, अधिक माहिती अशी, झेलम एक्‍सप्रेस जम्‍मूहून पुण्‍याकडे येत होती. लुधियानजीक फिलौर आणि लधोवाल स्‍टेशनांदरम्‍यान, पहाटे ३ वाजून ५ मिनिटांनी बी ५, एस १, एस २, एस ३ , एस ४, एस ५, एस ६, एस ७, एस ८ हे रेल्‍वेचे डबे रुळावरुन घसरले. ही रेल्‍वे सतलज पुलाजवळ पोहोचताना ही घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.  प्रवाशांना व्‍यवस्‍थितपणे पोहोचवण्‍यासाठी रेल्‍वे प्रशासनाने दुसर्‍या रेल्‍वेचीही सोय केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *