‘पाक’ची नापाकी सुरुच, मोदींना धमकी?

पाकाच्या नापाकी कारवाया काही केल्‍या थांबायला तयार नाहीत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  फुग्‍यातून धमकीचे पत्र पाठवल्‍यानंतर आता पाकिस्तानने कबुतराचा वापर करुन भारताला पुन्हा धमकावले आहे. बीएसएफच्या जवानांनी बमियाल सेक्टरमधील सिंबल चौकीवर एक संशयित कबुतर घिरट्या घालताना दिसल्याने त्याला ताब्यात घेतले. या कबुतराच्या पायाला उर्दू भाषेत पत्र बांधून पाठवले आहे. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून धमकी देण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ‘सीमेपलीकडून एक कबुतर धमकीचा मजकरू असलेली चिठ्ठी घेऊन भारतीय सीमेत आले होते. सीमेजवळ असलेल्या बमिआल सेक्टरमधील सिंबल चौकीजवळ जवानांना करड्या रंगाचे हे कबुतर मिळाले. त्याच्या पायाला मोदींना उद्देशून उर्दू भाषेत लिहिलेला संदेश होता. या संदेशामध्ये म्‍हटले होते की, ‘मोदीजी तुम्ही आम्हाला १९७१ च्या युद्धाप्रमाणे समजू नका. आता प्रत्येक मुलगा भारताविरोधात लढण्यासाठी तयार आहे.

दरम्यान, रविवारी याच परिसरातील गुरुदासपुरच्या दीनानकरमधील घेसल गावातून दोन फुगे जप्त करण्यात आले होते. या फुग्यांसोबतही असेच एक पत्र पाठवून त्याद्वारे भारताला धमकी देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *