जपान – संशोधकाला औषधांतील नोबेल

जपानचे संशोधक योशिनोरी ओसुमी यांना औषधांतील नोबल पुरस्कार जाहीर झाला आहे. मानवी शरीरातील ऑटोफॅगी ही प्रक्रिया त्यांनी सविस्तर शोधली आहे. मानवी शरीरातील पेशी स्वत:ला नष्ट करत असतात. या प्रकियेत काही बदल झाला तर मधुमेह, पर्किन्सन्स असे आजार होऊ शकतात, हे त्यांनी दाखून दिले आहे.
शरीरातील पेशी कशा नष्ट होतात आणि त्यातील घटक कसे रिसायकल होतात हे योशिनारी यांनी सिद्ध करून दाखवले. इस्टवर त्यांनी प्रयोग करून ही प्रक्रिया दाखवून दिली. पेशी स्वत:ला खात असतात. याला ऑटोफेजी म्हणतात. मानवी शरीरासाठी ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे.  ही प्रक्रिया नियंत्रित करणारे जीन्स त्यांनी शोधून काढले. या जीनमधील झालेला बिघाड मधुमेह आणि पर्किन्ससन्स सारख्या आजारांना कारणीभूत ठरतो हे त्यांनी दाखवून दिले.
ऑटोफेजी नैसर्गिक प्रक्रिया असते. शरीरासाठी ही प्रक्रिया आवश्यक असते. नव्या पेशींच्या निर्मितीसाठी यातून जागा निर्माण होते.  या संशोधनानंतर औषध निर्मिती क्षेत्रात नवे संशोधन सुरू झाले. ऑटोफेजीतमधील अडथळे दूर करण्यासाठी औषधे निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *