हिंगोलीमध्ये रोजगार हमीच्या कामातून बांधण्यात आलेला रस्ताच चक्क गायब झाला. हो हे खरं आहे.
येथील माथा- सुकापूर हा रस्ता बांधण्यात आल्याची कागदोपत्री नोंद आहे. तसेच त्या बांधकामाच्या बदल्यात 24 लाख रुपयांचं बीलही उचलण्यात आले.
मात्र, कागदोपत्री असलेला हा रस्ता प्रत्यक्षात मात्र येथे दिसत नाही. त्यामुळे औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये याबाबत तक्रार करण्यात आली आणि येथील विकास अधिकारी सुधीर ठोंबरेंनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.