चीन : ‘मेगी वादळ’; सावधानतेचा इशारा

    चीन : ‘मेगी वादळ’; सावधानतेचा इशारा

ताइवानमध्‍ये ‘मेगी’ वादळ येण्‍याच्‍या पार्‍श्‍वभूमीवर सर्व शाळा, कार्यालये बंद करण्‍यात आली आहेत. ३६ हजार घरांमधील वीज बंद करण्‍यात आली आली आहे. मेगी वादळाच्‍या परिणामामुळे जोरदार हवा आणि मुसळधार पाऊस पडत आहे. आठवड्यात तिसर्‍यांदा वादळ येण्‍याची चिन्‍हे ताईवानमध्‍ये दिसत आहेत. त्‍यामुळे आज येथील हजारों नागरिकांना सुरक्षित स्‍थळी नेण्‍यात आले आहे. येथील शाळा, कार्यालये बंद करण्‍यात आली आहे. हवाई उड्‍डाणेही रखडली आहेत.
‘सेंट्रल इमर्जेन्सी ऑपरेशन सेंटर’ च्‍या अनुसार, पाच हजारहून अधिक लोकांना सुरक्षित स्‍थळी नेण्‍यात आले आहे. वादळामुळे आज सकाळची एकूण ५७५ आंतरराष्ट्रीय तसेच इतर उड्‍डाणे रद्द करण्‍यात आली आहेत. तसेच रेल्‍वे सेवा ठप्‍प झाली आहे. ३ हजार ७०० हून अधिक पर्यटकांना आर्किड आयलँड तसेच ग्रीन आयलँडहून इतर ठिकाणी नेण्‍यात आले आहे. या दोन्‍ही ठिकाणी पर्यटकांची संख्‍या अधिक असते. ताइवान हवामान ब्युरोच्‍या माहितीनुसार, हवेचा वेग १८ किमी प्रति तास आहे. यापुर्वीही ताइवानमध्‍ये या महिन्‍याच्‍या सुरुवातीला ‘मेरांती’ वादळ आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *