अनुष्का पुन्हा बनणार पत्रकार

अनुष्का शर्माने यापूर्वी पत्रकाराची भूमिका साकारलेली आहे. ‘पीके’ मध्ये ती एक टीव्ही जर्नलिस्ट बनली होती. आता ‘पीके’च्याच राजकुमार हिरानीच्या आगामी चित्रपटातही ती पत्रकाराची एक छोटीशी, पण दमदार भूमिका साकारू शकते. हा चित्रपट अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात संजयच्या भूमिकेत रणबीर कपूर आहे.

आपल्या भूमिकेसाठी रणबीरच योग्य असल्याचे संजयने सुचवले होते. त्यावरूनच त्याचे सलमान खानशी बिनसले. रणबीर आणि सलमानमध्ये कॅटरिनामुळे वितुष्ट आहे हे तर जगजाहीर आहे. संजयने मात्र आपल्या जुन्या दोस्ताच्या मैत्रीचा बळी देऊन रणबीरला पाठिंबा दिला. आता या चित्रपटाचे काम वेगाने सुरू आहे. यामध्ये संजयच्या आयुष्यातील सर्व चढ-उतार दाखवले जातील. चित्रपटातील पत्रकाराच्या भूमिकेसाठी अनुष्कालाच घ्यावे असे स्वतः राजकुमार हिरानीचे मत होते. हा चित्रपट अनुष्काने केला तर ‘बॉम्बे वेल्वेट’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ नंतर तिचा हा रणबीरबरोबरचा तिसरा चित्रपट ठरेल. तिनही खानांसमवेत काम केलेल्या अनुष्काचा उत्स्फूर्त अभिनय अनेकांना पसंत आहे. सध्या तिच्या रणबीर आणि ऐश्‍वर्याबरोबरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *