आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व

पाणी म्हणजे जीवन! आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक! आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माणसाच्या शरीररचनेत मोठी जागा ही पाण्याने व्यापलेली असते. शरीराच्या विविध क्रियांमध्ये पाण्याचा समावेश होतो. पचनक्रिया, अन्नशोषण प्रक्रिया, लाळनिर्मिती, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वांना शरीरभर पोहोचवण्याचे काम इत्यादींमध्ये पाण्याचा सहभाग महत्त्वपूर्ण असतो.

पाण्याने मेंदूतल्या पेशींना चालना मिळते, त्यामुळे शरीराचे कार्य व्यवस्थितपणो चालते.शरीराला वंगण म्हणून पाण्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते.पाणी प्यायल्याने मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढते.शरीरातील उत्साह टिकून राहतो.पाणी योग्य प्रमाणात प्यायल्याने त्वचा तेजस्वी होते.शरीरातील अनावश्यक घटक पाण्याद्वारे शरीराबाहेर टाकले जातात.पाणी प्यायल्याने शरीरातील गॅससंदर्भातील तक्रारी दूर होतात. अन्नपचनास मदत होते.

*पाण्याचे महत्त्व:- पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शारीरिक वजनाच्या ५५ ते ६५ टक्केवजन पाण्याचे असते. शरीरातले पाणी जर कमी झाले तर आरोग्याला गंभीर अपाय होतो. शरीरातील प्रत्येक पेशीच्या क्रियांसाठी पाण्याचा वापर होतो.

अन्नपदार्थ ग्रहण करणे आणि विष्ठेच्या रूपात बाहेर टाकणे यासाठी पाण्याचाच उपयोग होतो.शारीरिक तापमान समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. हे शरीरातील भागासाठी वंगणाचे काम करते. पाणी अन्नाच्या प्रत्येक उष्मांकाला आवश्यक असते. म्हणजे रोजच्या १५00 ते २000 आवश्यक कॅलरीजसाठी दररोज ६ ते ८ ग्लास पाणी (१.५ ते २ लिटर) पिणे प्रत्येक दिवसाला गरजेचे असते. आपल्याला येणारा घाम, मूत्र आणि विष्ठेतून पाणी शरीरातून बाहेर उत्सजिर्त केले जाते. या उत्सर्जनाच्या प्रमाणात आपला पाणी पिण्याचा रोजचा कोटा असावा. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे.

*निरामय पाणी : -आपण निरोगी राहण्यासाठी पाणी तर लागतेच; पण ते स्वच्छ, शुद्ध आणि रोगजंतूविरहित असावे लागते. पिण्याच्या पाण्यामधून अनेक प्रकाराचे विषाणू, जीवाणू, रोगजंतू, जंत आणि विषारी पदार्थ शरीरात जाऊन आपले आरोग्य बिघडवू शकतात. त्यामुळे पाणी शुद्ध करून पिणे जरुरी असते. त्यासाठी -पाणी गाळून घेऊन १0 ते १५ मिनिटे उकळल्यास त्यातील अनावश्यक क्षार निघून जातात आणि पाण्याचा जडपणा नष्ट होतो, तसेच त्यातील बरेचसे जीवजंतू नष्ट होतात.0.५ ग्रॅम क्लोरिनच्या गोळ्या पाण्यात टाकल्यास ते निर्जंतुक होते.बाजारात अनेक प्रकारचे पाण्याचे फिल्टर्स आणि छोटी-मोठी शुद्धिकरण उपकरणे मिळतात. आपल्या रोजच्या गरजेप्रमाणे त्याचा वापर करणे हितावह ठरू शकते.

*पेये आणि पाणी : – आपल्या शरीराला रोज लागणार्‍या पाण्यापैकी काही भाग आपल्याला वेगवेगळ्या पेयांपासून मिळू शकतो. मात्र ही पेये घेताना त्यापासून मिळणार्‍या पोषणमूल्यांचा, तसेच त्यामुळे होणार्‍या शारीरिक हानीचा विचार करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *