मेट्रो-2 चा उर्वरित टप्पा आणि मेट्रो-4 मार्गाला राज्य मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार आहे.
मेट्रो-2 चा उर्वरित टप्पा डीएन नगर-वांद्रे-मानखुर्द असा असेल. हा मार्ग 24 किमीचा असेल तर मेट्रो-4च्या 33 किमी मार्गालाही मंजुरी देण्यात आलीय.
वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली असा हा मार्ग असेल. येत्या 4 वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मेट्रो-4मुळे मुंबई आणि ठाणे आणखी जवळ येणार आहे.