समोरची व्यक्ती खोटं बोलतेय हे कसं ओळखाल?

एखादा व्यक्ती खोटं बोलतोय की खरं बोलतोय हे ओळखण्यासाठी खास ज्ञान असणे गरजेचे नसते. थोड्याशा माहितीनेही तुम्ही हे ओळखू शकता. समोरची व्यक्ती तुमच्याशी खोट बोलतेय हे ओळखण्यासाठी या टिप्स

शारिरीक संकेत – खोट बोलणाऱ्या व्यक्ती सहसा नजरेला नजर देऊन बोलत नाहीत. खोटं खोटं हसण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा आवाज कमी होतो.

केसांमध्ये सतत हात फिरवणे – खोटं बोलणाऱ्या व्यक्ती समोरच्याशी नजर देऊन बोलू शकत नाहीत. त्यांची नजर झुकलेली असते कारण त्यांना भिती असते की त्यांचा खोटारडेपणा उघड तर होणार नाही ना?

कमी आत्मविश्वास – खर आणि ईमानदार व्यक्ती नेहमी आत्मविश्वासाने बोलत असतात. त्यांच्या बॉडी लँग्वेजवरुन त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो. मात्र खोटं बोलणाऱ्या व्यक्तींकडे आत्मविश्वासाची कमतरता असते आणि ते त्यांच्या बॉडी लँग्वेजवरुन दिसून येते. त्यांचे हात पाठी असतात. तसेच बेचैन असतात.

खोट खोटं हसणे– खोटं बोलणाऱ्या व्यक्ती नेहमी खोटं खोटं हसण्याचा प्रयत्न करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *