चक्क जेनेलियानेच रितेशला मिळवून दिले त्याचे हरवलेले पहिले प्रेम….

बॉलीवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जेनेलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटामध्ये एकत्र आल्यानंतर आज या जोडीचा संसार गुण्या गोविद्यांने सुरु आहे. अर्थात या जोडीकडे पाहिले की जेनेलिया आणि रितेश एकमेकांसाठीच बनले आहेत, असे कोणीही मान्य करेल. दोन मुलांचा बाबा झाल्यानंतरही रितेशचे जेनेलियावरील प्रेम किंचितही कमी झालेले नाही. रितेशने वेळोवेळी दोघांच्या आनंदाचे क्षण सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर करीत हे दाखवूनही दिले आहे. यांच्या आनंदाचे क्षण पाहून कोणीही सहज मान्य करेल, की जेनेलियाच रितेश देशमुखचे पहिले प्रेम असावे.

मात्र, मराठमोळ्या अभिनेत्याने आपले पहिले प्रेम जेनिलिया नव्हे तर दुसरेचं कोणीतरी असल्याचे मान्य सांगितले. रितेशने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या पहिल्या प्रेमाचे गुपित  उलगडले.  वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या जीवन शैलीविषयी त्याने दिलखुलास गप्पा मारल्या. यामध्ये त्याने आपल्या पहिल्या प्रेमाचे सत्य सांगितले.  बॉलीवूडमध्ये मराठी चेहरा बनून झळकलेल्या रितेशला चित्रपटात येण्याची बिल्कूल इच्छा नव्हती. त्याला फोटोग्राफीचा अफाट छंद होता. रितेश आपल्या या छंदावर जीवापाड प्रेम करायचा. त्यामुळे फोटोग्राफी हे आपले पहिले प्रेम असल्याचे रितेशने म्हटले आहे. मात्र  चित्रपटात पदार्पण केल्यानंतर त्याला आपल्या प्रेमाचा विसर पडला होता.

जेनेलियानेच त्याला पुन्हा फोटोग्राफी करण्याचा सल्ला दिला. फक्त सल्ला देऊन न थांबता तिने त्याला कॅमेरा भेट देऊन आपल्या पतीचे हरवलेले प्रेम जेनेलियाने पुन्हा मिळवून दिले. रितेशला फोटोग्राफीचा इतका छंद आहे की, चित्रिकरणादरम्यान देखील तो फोटोग्राफीचे शिकत होता. या प्रेमामुळेच त्याने दुबईमध्ये एका फोटोग्राफीच्या शिबिरामध्येही सहभाग झाला होता. नुकताच रितेश देशमुख ‘बँजो’ या हिंदी चित्रपटातून झळकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *