स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी कर्ला बस स्टॉपजवळ दोन संशयित आरोपींकडून 46 हजार रुपये किमतीचा 1 किलो 584 ग्रॅम वजनाचा गांजा आणि एक दुचाकी जप्त केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक एस. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रविराज फडणीस, सहायक पोलिस फौजदार सुभाष माने, सागर साळवी, प्रवीण बर्गे, गुरू महाडिक, संदीप काशिद, संदीप मालप, वैभव मोरे, दत्ता कांबळे, तसेच पंच संजय पिलावले, प्रकाश वाजे आणि दिलीप जाधव यांनी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. यामध्ये दोन संशयित आरोपींकडून एक दुचाकी (क्र. एमएच 08 एस 7167) आणि 1 किलो 584 ग्रॅम गांजा असा एकूण 46 हजार रुपयांचा माल जप्त केला. नदीम अहमद इब्जे यासीन साखरकर (47, रा नवा कर्ला, रत्नागिरी ) आणि जहीर महामुद काझी (35, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरध्द रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1958 चे कलम 8 (क), 20 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात खबर्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अपर पोलिस निरीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक कर्ला बस स्टॉपजवळ सापळा रचून बसले होते. त्यावेळी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 2 संशयित आरोपी दुचाकीने तेथे आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना या पथकाने ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे हा माल आढळून आला.