मुंबईत व्यवसाय करणे आता सोपे

शहरात विविध उद्योगधंदे सुरू करण्यासाठी पालिकेच्या इमारत व कारखाना विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे; पण या परवान्याच्या किचकट प्रक्रियेमुळे परवानगी घेणे नकोसे  होते. त्यामुळे पालिकेने इझ ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत 46 परवानग्यांपैकी 27 परवानग्या रद्द केल्या आहेत. लघुउद्योग करणार्‍यांना हा मोठा दिलासा आहे. एकूण 46 परवानग्यांपैकी 27 परवानग्या रद्द करण्याच्या प्रस्तावास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शुक्रवारी मंजुरी दिली.

या परवानग्यांमध्ये महापालिकेच्या दुकाने व आस्थापना, सार्वजनिक आरोग्य खाते, प्रमुख अग्निशमन अधिकारी, प्रमुख अभियंता (विकास नियोजन) यांच्याद्वारेही संबंधित परवानग्या दिल्या जातात. पुनरावृत्ती टाळण्यासाठी इमारत व कारखाने या खात्याद्वारे दिल्या जाणार्‍या परवानग्या रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *