सीफूड निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत जगात सातव्या क्रमांकावर असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य (स्वतंत्र पदभार) राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
विशाखापट्टनम येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय सीफूड प्रदर्शनाच्या कार्यक्रमात सीतारामन बोलत होत्या. “सागरी उत्पादनांच्या व्यावसायिकांनी या क्षेत्रात मोठा व्यवसाय दिसल्याने आज या क्षेत्राला भरभराट मिळाली आहे. त्यामुळे याचे श्रेय मी त्यांनाच देते. त्यांच्याशिवाय सीफूड करण्यात भारत जगात सातव्या क्रमांकावर पोचला नसता.‘
सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (एमपीईडीए) आणि भारतातील सीफूड निर्यात संघटनेने (एसईएआय) या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री एम. वेंकय्या नायडू आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. स्थानिकांसह निर्यातीच्या बाजारपेठेतील व्यावसायिकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित आणि शाश्वत भारतीय सागरी उत्पादने घेणे हा या प्रदर्शनामागचा हेतू आहे.