वाढदिवसाला मला भेटवस्तू नको, जवानांना मदत करा : लता मंगेशकर

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी मोहीम सुरु केली आहे. 28 सप्टेंबरला लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने लता मंगेशकर यांनी सीमेवर लढताना जायबंदी होणाऱ्या जवानांसाठी मदतनिधी उभारण्याचा संकल्प केला आहे.

या निधीसाठी सर्व देशवासियांनी सढळ हाताने मदत करण्याचं आवाहन लतादिदींनी केलं आहे. माझ्या वाढिदवसाला भेटवस्तू देण्याऐवजी, चाहत्यांनी सैन्याच्या निधीत योगदान करावं, अशी कळकळीची विनंती लता मंगेशकर यांनी केली आहे.

लता मंगेशकर यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, “मी माझ्यापरीने आर्मी वेलफेअर बॅटल कॅज्युअल्टीजमध्ये काही रक्कम जमा करणार आहे. जर तुम्ही पण योगदान दिल्यास मी कायम कृतज्ञ राहिन. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला हजारोंच्या संख्येने फूल, मिठाई, केक, ग्रीटिंग कार्ड्स पाठवता. पण यावेळी मला भेटवस्तू पाठवण्याऐवजी तीच रक्कम आपल्या वीर जवानांसाठी द्या. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहिल, असा विश्वास आहे, जय हिंद, वंदे मातरम.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *