परमजिस सिंग व त्यांचा मुलगा गुरजीत हे रुग्णाला घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. एका परिचारिकेने दोघांना काही वेळ बसण्यास सांगितले होते. यामुळे चिडलेल्या गुरजीत याने खुर्चीवर बसलेल्या गर्भवती परिचारिकेवर हल्ला करून विनयभंग केला. संबंधित छायाचित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या परिचारिकेने सांगितले की, ‘परमजिस सिंग व गुरजीत यांना खुर्चीवर बसण्यास सांगितले. आम्हाला ओळखले नाही का म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात मारहाण केली.‘
रुग्णालयाचे डॉक्टरांनी सांगितले की, ‘राजकीय नेता व त्यांच्या मुलाने एका गर्भवती परिचारिकेवर हल्ला केला आहे. याबाबत पक्षाला पत्र लिहून त्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी करणार आहोत.‘
