शहरामध्ये एका इमारतीची बाल्कनी कोसळून 5 ठार तर 8 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली.
पोलिस अधिकारी जेनिफर कोट्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्निया विद्यापिठाजवळ असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनी कोसळली असल्याची माहिती आम्हाला एका वाजता समजली. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बाल्कनी कोसळल्या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परंतु, याबाबत माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शिवाय, एवढ्या प्रमाणात नागरिक बाल्कनीत काय करत होते. याबाबत माहिती घेणार आहोत.
