येत्या 48 तासांत मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस

येत्या 48 तासांत मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस

येत्या 48 तासात मुंबईसह कोकण आणि गोवा किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.

नैऋत्य मोसमी वारे उत्तरेकडे सरकत असून येत्या 48 तासात देशात सर्वत्र चांगला पाऊस होईल असा अंदाजही वेधशाळेने व्यक्त केला आहे.

सध्या वायव्य बंगालच्या उपसागरातील ओडिशा किनारपट्टीवर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिम बंगालच्या उपसागराकडे सरकले आहे. तसेच उत्तरे लगतच्या मध्य अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागावर कमी दबाचे क्षेत्र तयार झाल्याने मुंबईसह कोकण आणि गोव्यात अतिवृष्टी सुरु आहे.

येत्या 48 तासात अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र विरुन गेले असले, तरी कोकण आणि गोव्यात तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *