जयललिता रुग्णालयात दाखल

ताप आणि सतत होणा-या उलटीच्या त्रासामुळे गुरुवारी रात्री उशीरा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुक सरचिटणीस जयललिता यांना चेन्नई येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जयललितांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच अण्णा द्रमुकचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी केली आहे. तर नागरिक ‘अम्मा’च्या चांगल्या आरोग्यासाठी रस्त्यावर प्रार्थना करत आहेत. सध्या अपोलो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जयललितांची प्रकृती स्थिर असून चितेंचे कारण नसल्याचे या रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बीह विश्वनाथन यांनी सांगितले आहे. दरम्यान यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रुग्णालयाच्या आवारात पोलिसांनी कडक सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *