भारतीय हवाई दलाचे जॅग्वार हे लढाऊ विमान मंगळवारी सकाळी उत्तरप्रदेशातील अलाहाबादमध्ये कोसळले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
वैमानिकांनी आधीच स्वत:ची सुखरुप सुटका करुन घेतल्याने ते बचावले. अलाहाबादमधल्या नैनीमध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामाजवळील निर्मनुष्य भागात हे विमान कोसळल्याने जिवीतहानी टळली.
सकाळी ७.२५ च्या सुमारास या लढाऊ विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले होते. सकाळी पावणेनऊच्या सुमारास हे विमान कोसळले. हवाई दलाच्या तळापासून ५० कि.मी. अंतरावर ही दुर्घटना घडली.
या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या वर्षातील जॅग्वार विमान कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. विमान कोसळण्यापूर्वी दोन्ही वैमानिकांनी स्वत:ची सुखरुप सुटका करुन घेतल्याने ते बचावले. यावर्षी मार्च महिन्यात हरयाणातील शाबाद भागामध्ये एका शेतात जॅग्वार विमान कोसळले होते. त्यावेळीही वैमानिकाने स्वत:ची सुखरुप सुटका करुन घेतली होती.

