पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूने तब्बल 21 वार, आरोपी अटकेत

पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूने तब्बल 21 वार, आरोपी अटकेत

पुण्यामध्ये त्रिमुर्ती कॉलनीतील एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोपीने तरुणीवर तब्बल 21 वार केले आहेत.

काल सकाळी आरोपी स्वप्निल कुंभार यांने तरुणीवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला केला. गेल्या दोन वर्षापासून या दोघांची ओळख होती. मात्र, तरुणीने त्याला नकार दिल्याने रागाच्या भरात आरोपीने तिच्यावर चाकू हल्ला केला.

पुण्यामधील या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक चौकशी सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *