चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया या तीनही देशांचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्यरात्री मायदेशात परतले. या दौ-यादरम्यान अनेक महत्त्वाच्या करांरावर स्वाक्ष-या करण्यात आल्या.
१४ मेपासून त्यांनी तीन देशांच्या दौ-याला सुरुवात केली होती. सर्वप्रथम त्यांनी चीनला भेट दिली. यावेळी त्यांनी शांघाय, बिजींग, शिआन या प्रमुख शहरांना भेटी दिल्या. तसेच चीनचे पंतप्रधान ली क्विंकग यांच्यासोबत भारत-चीन नियंत्रण रेषेबाबत चर्चा केली.
चीन दौ-यानंतर मोदींनी मंगोलिया देशाचा दौरा केला. भारतीय पंतप्रधानांचा मंगोलियाचा हा पहिलाच दौरा होता. या दौ-यादरम्यान त्यांनी मंगोलियाच्या विकासाकरिता एक अब्ज अमेरिकन डॉलरची मदतीची घोषणा केली. त्यानंतर ते दक्षिण कोरियाला रवाना झाले. यावेळी अनेक महत्त्वांच्या व्यवसायिक करारावर स्वाक्ष-या झाल्या.