गुआमने 2018 मध्ये होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताचा 2-1 असा पराभव केला.
जागतिक क्रमवारीत 174 व्या स्थानावर असलेल्या गुआमने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत भारताला संधीच दिली नाही. गुआमच्या संघ भारताच्या क्रमवारीपेक्षा 33 स्थानांनी मागे असूनही त्यांनी भारतीय खेळाडूंना सर्वच स्तरावर मागे सोडले. गुआमच्या मॅकडोनाल्डने 35 व्या मिनिटालाच गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर टी. निक्लो याने 64 व्या मिनिटाला गोल करत गुआमची आघाडी आणखी वाढविली. भारतीय खेळाडूंनी गोल करण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना अपयश आले. अखेर सुनील छेत्रीला सामन्याच्या अधिक वेळेत 93 व्या मिनिटाला गोल करण्यात यश आले. पण, तोपर्यंत सामना भारताच्या हातून निसटला होता.
