कल्याण पश्चिमेकडील सागर भानू परिसरात राहणारी यास्मीन शेख ही महिला कॉन्स्टेबल घरात मृत अवस्थेत सापडली. रविवारी रात्री ही घटना घडली आहे.
यास्मीन शेख या मुलुंडच्या वाहतूक विभागात कार्यरत होत्या. यास्मीन यांच्या पतीच्या सांगण्यानुसार यास्मीननं दुकानातून काही सामान आणण्यासाठी पाठवले. मात्र घरी परत आल्यावर पत्नी यास्मीन मृत अवस्थेत आढळल्याची माहिती तिचा पती मिहीउद्दीन यानं दिली.
यास्मीन यांच्या गळ्यावर व्रण आढळून आले आहेत. गेल्या वर्षभरापासून पती पत्नीमध्ये वाद सुरु असल्याचा आऱोपही यास्मीन यांच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

