समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या मृत्यूची अफवा पसरल्यानंतर एका चाहत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुलायमसिंह यादव यांचा मृत्यू झाल्याची अफवा हॉट्सऍपवरून पसरली होती. आग्रापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या नगला परमसुख गावातील हरचरणसिंह यादव यांच्या मोबाईलमध्ये ही अफवा आली. मोबाईलवर माहिती वाचल्यानंतर ते जागीच कोसळले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हरचरणसिंह यादव हे मुलायमसिंह यादव यांचे चाहते होते. हरचरणसिंह यांच्या घरात मुलायमसिंह यांची अनेक छायाचित्रे लावलेली आहेत. शिवाय, त्यांच्या रॅलीमध्ये ते नुकतेच सहभागी झाले होते. गावकऱयांना मुलायमसिंह त्यांच्यावरील प्रेमाबद्दल माहित होते. परंतु, हरचरणसिंह यांचा मृत्यू अशा प्रकारे होईल, असे कोणाला वाटले नव्हते.

