क्षेपणास्त्राची चाचणी ‘ यशस्वी ‘

ओडिशा राज्यामधील भारतीय लष्कराच्या तळावरुन आज (मंगळवार) बराक – आठ या दीर्घ पल्ल्याच्या, जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र भारत व इस्राईलने संयुक्तरित्या विकसित केले आहे. चंडीपूर येथे ही आज सकाळी ही चाचणी घेण्यात आली.

या क्षेपणास्त्रामध्ये बसविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण रडार व्यवस्थेमुळे (एमएफ स्टार) हवाई मार्गाने येणारा कोणताही धोका नष्ट केला जाऊ शकतो, असे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) एका उच्चाधिकाऱ्याने सांगितले. या क्षेपणास्त्राच्या आणखी काही चाचण्याही नजीकच्या भविष्यकाळात घेतल्या जाणारआहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *