दिल्ली – एका युवकाने केली शाईफेक

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर आज नायब राज्यपालांच्या कार्यालयाबाहेर एका युवकाने शाईफेक केली. ब्रजेश शुक्ला असे या युवकाचे नाव आहे. दिल्लीत डेंग्यू आणि चिकनगुनियाने थैमान घातलेले असताना सिसोदिया मात्र आमच्या पैशांवर फिनलँडची वारी करायला गेले. हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. याच रागातून आपण हे कृत्य केल्याची कबुलीे ब्रजेशने दिली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान शाईफेकची ही घटना म्हणजे काँग्रेस आणि भाजपच्या घाणेरड्या राजकारणाचे प्रतिबिंब आहे अशी प्रतिक्रिया सिसोदिया यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *