मध्य प्रदेशात हृदयरुग्ण मुलांवर मोफत उपचार

मध्य प्रदेशात हृदयरोग असलेल्या मुलांचा उपचारांचा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे. सध्या २ लाखांपर्यंतचा खर्च दिला जात होता, पण आता ती मर्यादाही उठवली आहे. हृदयरोग असलेल्या मुलांचा उपचारांचा सगळा खर्च सरकार करील, असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. ते म्हणाले की, आधी २ लाखांपर्यंतचा खर्च दिला जात होता, पण आता सगळा खर्च सरकार करील. बालहृदय अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सरकारने या मोहिमेत हृदयरोगग्रस्त मुलांची माहिती गोळा करण्याचे ठरवले आहे. मधुमेह व थॅलेसेमिया हे रोग असलेल्या मुलांनाही मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मेदांचा समूहाचे डॉ. नरेश त्रेहान हे या वेळी उपस्थित होते. या योजनेत ३७३ मुलांना इंदोर जिल्ह्य़ात उपचार उपलब्ध करून दिले आहेत. मध्य प्रदेशात मुलांमध्ये हृदयरोग, मधुमेह व थॅलेसेमियाचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे हृदयरुग्ण मुलांना दिलासा मिळणार आहे. कारण त्यांच्या उपचारांसाठी सोयी-सुविधा तसेच पैसाही पुरेसा उपलब्ध नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *