जालन्यात पोलीस उपनिरीक्षकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

जालना येथे ड्युटीवर असलेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. प्रभाकर पाठाडे असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून ते जालना पोलीस अधिक्षक कार्यालयात नियंत्रण कक्षात कार्यरत होते. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली.
पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पाठाडे हे जालना पोलीस अधिक्षक कार्यालयात नियंत्रण कक्षात ड्युटीवर होते. आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. घटनास्थळापासून सुसाईड नोट मिळाल्याचे वृत्त एका वृत्त वाहिनीने दिले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *