वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींची मातृभेट, दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 66वा वाढदिवस आहे. आपला वाढदिवस गुजरातमध्येच साजरा करण्याचं मोदींनी ठरवलं आहे. आज सकाळी गांधीनगरमध्ये जाऊन मोदींनी आपली आई हिराबा यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतला. विशेष म्हणजे आईची भेट घेण्यासाठी जाताना मोदींनी गाड्यांचा आणि अधिका-यांचा ताफा सोबत नेणं टाळलं. ज्या कारमधून मोदी गेले फक्त ती एक कारच त्यांच्योसबत होती. वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी एक टनाहून अधिक वजनाचा जगातील सर्वात उंच पिरॅमिड केक बनवण्यात आला आहे. प्रशासन, विज्ञान, क्रीडा आणि कलेसह विविध क्षेत्रात भरीव योगदान देत देशाला गौरवान्वित करणाऱ्या देशातील सुकन्यांना सन्मानित करण्यासाठी ‘ एम्पॉवरिंग डॉटर्स : एम्पॉवरिंग इंडिया’ असा अनोखा संदेशही या केकवर कोरला जाणार आहे. विविध क्षेत्रात नाव कमावणाऱ्या मुलींच्या कामगिरीचा उल्लेखही त्यावर असेल. सुरत येथे हा केक कापण्यात येणार आहे. गुजरातची प्रसिद्ध अतुल बेकरी, शक्ती ही स्वयंसेवी संस्था तसेच देशभरात ३० पेक्षा जास्त गिटार केंद्र संचालित करणाऱ्या ‘गिटार मॉन्क’ या संस्थेने मोदींचा अनोखा वाढदिवस साजरा करण्याची तयारी चालविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *