इराकची राजधानी बगदादमध्ये एका बाजाराजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात १० जणांचा मृत्यू झाला. काहिरा भागामध्ये हा हल्ला झाला.
या बॉम्बस्फोटात अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे. हल्ल्यामध्ये सुमारे २० जण जखमी झाले आहेत. अनेक गाड्या आणि दुकाने जळाल्याचे वृत्त आहे.
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्विकारलेली नाही.

