जातपंचांनी बहिष्कृत केलेल्या दाम्पत्याने केली मुख्यमंत्र्यांच्या गणपतीची आरती

जातपंचांच्या जाचाविरोधात दाद मागण्यासाठी मंत्रालयाच्या दारात गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन बसलेल्या देवाळेकर दांपत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर बोलावून आपल्या गणपतीची आरती करुन घेतली. सोबतच पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिका-यांना गावात जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेशही दिले आहेत.
कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे या गावात देवाळेकर दाम्पत्य राहतं. या दाम्पत्याला 2006 पासून गावातील जातपंचांनी वाळीत टाकलं आहे. गावातील रुढी पंरपरांना विरोध केल्यामुळे हा प्रकार घडला आहे.
गेल्या वर्षी या दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली. त्यावळे मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. मात्र काहीही कारवाई झाली नाही. यंदा गणपती उत्सवासाठी देवाळेकर दाम्पत्य गावात गेलं असता जातपंचांनी त्यांना गावात प्रवेश नाकारला . यानंतर देवाळेकर दाम्पत्य थेट मंत्रालयाच्या दारात गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन उपोषणाला बसलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *