बाहुली समजून पाच दिवसांच्या मुलीला लगावला ठोसा

मँचेस्टरच्या सुपरमार्केटमध्ये पाच दिवसांच्या मुलीला ठोसा लगावल्या प्रकरणी एका ६३ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी एमाय डयुकर्स आपल्या पाचदिवसांच्या मुलीला घेऊन बाग्युले येथील टीस्को स्टोअरमध्ये गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा पती आणि सात वर्षांची मुलगी होती.
दुकानात शॉपिंग करताना डयुकर्स यांना त्यांचे शेजारी भेटले. ही शेजारी महिला त्या दुकानात नोकरी करते.  डयुकर्स त्यांना आपली मुलगी कशी दिसते ते दाखवत होत्या. तितक्यात डयुकर्स यांच्या शेजारणीला ओळखीची एक महिला दिसली.
शेजारणीने त्या महिलेला हाक मारली. ती तिच्यापतीसोबत दुकानात शॉपिंग करत होती. त्या महिलेच्या पतीने थेट येऊन पाच दिवसांच्या एल्सी रोझला ठोसा लगावला. ती खरीखुरी मुलगी नसून बाहुली असल्याचे आपल्याला वाटले म्हणून आपण ठोसा लगावला असे आरोपीने पोलिसांना सांगितले.
अचानक झालेल्या या हल्ल्याने डयुकर्स पूर्णपणे भेदरल्या. क्षणभरासाठी काय झालेय तेच त्यांना कळले नाही. दुकानातील कर्मचा-यांच्या मदतीने त्यांनी मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. आरोपीची सध्या पोलिस चौकशी सुरु आहे,.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *