कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी न्यायाधीशांची अनोखी शक्कल, आवडीचे पदार्थ देत करतात रुसवा दूर!

कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी न्यायाधीशांची अनोखी शक्कल, आवडीचे पदार्थ देत करतात रुसवा दूर!

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ अशी आपल्याकडे म्हण प्रचलित आहे. अनेक प्रकरणांचा तर वर्षानुवर्षे निर्णयही लागत नाही. पर्यायाने वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होतो. यावर एका न्यायाधीशांनी चांगलाची शक्कल लढवली आहे. पक्षकारांना त्यांच्या आवडीचा पदार्थ खाऊ घालत दोघांमध्ये समेट घडवून आणतात.

खरगोन कोर्टाचे न्यायाधीश गंगाचरण दुबे हे पक्षकारांना त्यांच्या आवडीचे पदार्थ देऊन अनेक खटले निकालात काढतात. तसेच त्यांनी अनेक रोचक निर्णयही सुनावले आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे एका युवक आपल्या मुलाच्या डीएनए टेस्टसाठी अडून राहिला. त्या व्यक्तीला असा संशय होता की मुलगा हा त्याचा नाही. ही केस त्यांच्या कोर्टात आली. त्यानंतर दुबे यांनी कोर्टामध्ये विज्ञानाच्या पुस्तकातून मुलाच्या जन्माची प्रक्रिया समजावून दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने तो मुलगा आपलाच असल्याचे कबूल केले.

एका कौटुंबिक वादामध्ये त्यांनी पक्षकारांना आईस्क्रीम देत त्यांच्यातील भांडण संपवलं. पती-पत्नी दोघांना घटस्फोट हवा होता. न्यायाधीशांनी त्यांना विचारलं की तू हिच्यासाठी काय करु शकतो. त्याने उत्तर दिलं की माझं हिच्यावर प्रेम आहे. मी हिच्यासाठी जीवही देऊ शकतो. त्यावर त्याच्या पत्नीने कोर्टात सांगितले की आईस्क्रीम देखील देत नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना आपल्या पत्नीला आईस्क्रीम देण्याचा आदेश दिला आणि त्यांच्यातील दुरावा कमी केला.

तर एका प्रकरणात त्यांनी बटाट्याची भाजी देण्याचा पत्नीला सल्ला देऊन जोडप्याचं वैवाहिक आयुष्य वाचवलं. तर एका पती-पत्नीसाठी भर कोर्टातच बिर्यानी मागवली होती.

त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कल्पनेने अनेकांचे संसार वाचले आहेत. त्यांच्या या पद्धतीची वॉशिंग्टनमध्ये देखील दखल घेण्यात आली आहे. अनेक वर्षापासून भांडणाऱ्या अनेक जोडप्यांना त्यांनी अगदी एका दिवसामध्ये एकत्र आणण्याची किमया केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *