फिलिपिन्समधील दावोस शहरातील एका हॉटेल बाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात दहा जण ठार झाले. स्ट्रीट मार्केटमधील मार्को पोलो या हॉटेलबाहरे हा स्फोट झाला. यामध्ये ३० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या स्फोटामागील कारण अद्याप समजू शकले नाही.
फिलिपिन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते हे या शहरातील रहिवाशी आहेत. बॉम्बस्फोट झाला तेव्हा ते शहरात होते, मात्र ते सुरक्षीत असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी फिलिपिन्समध्ये झालेल्या स्फोटातील मृतांना श्रध्दांजली वाहिली आहे. तसेच या संकटकाळात फिलिपिन्सला सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.
