बालकाचे अज्ञाताकडून अपहरण

कमळापूर येथील आकाश आनंद जाधव (वय 4) या बालकाचे अज्ञात व्यक्तीने गुरुवारी दुपारी अपहरण केले. याबाबत विटा पोलिसांत त्याचे वडील आनंद जाधव यांनी फि र्याद दिली आहे. गुरुवारी आकाश हा शाळेतून चुलतआजी राधाबाई जाधव यांच्या घरी गेला होता.

आजीला तो ‘घरी जातो’ असे सांगून गेला होता. परंतु तो घरी पोहोचलाच नाही. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही. त्याच्या अचानक गायब होण्याचे गूढ न उकलल्याने त्याच्या वडीलांनी पोलिसांत धाव घेऊन फि र्याद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *