हवालदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

गुन्ह्यात अटक करून लागलीच जामीन करण्याकरिता एकाकडे सहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यातील हवालदार विजय निवृत्ती तळपे (वय 34, रा. गोंदणी, ता. अकोले, जि. अहमदनगर, सध्या-पेठ) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे देण्यात आलेली माहिती अशी : तक्रारदार  व त्याच्या वडिलांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल आहे.
 या गुन्ह्यात अटक करून तात्काळ जामीन मिळवून देण्यासाठी हवालदार तळपे याने संबंधिताकडे 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी  त्यांनी दि. 28 ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर हवलदार तळपे याला आज अटक करून त्याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 शासकीय कार्यालयातून कामाकरिता कोणी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा  असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *