हॉटेलमध्ये रोजंदारीवर काम करुन दहावीच्या परिक्षेत आकाश ने मिळवले 92 टक्के गुण

हॉटेलमध्ये रोजंदारीवर काम करुन दहावीच्या परिक्षेत आकाश ने  मिळवले 92 टक्के गुण

आयुष्यात यशस्वी होण्याचं ध्येय असेल तर डोंगरावएवढ्या संकटावर मात करता येते. हे उस्मानाबादमधील खेडच्या आकाश शिंदेनं दाखवून दिलं आहे. हॉटेलमध्ये रोजंदारीवर काम करुन आकाश न दहावीच्या परिक्षेत 92 टक्के गुण मिळवले आहेत.

घरात अठराविश्व दारिद्र. म्हणून लहानपणापासून हॉटेलमध्ये 20 रुपये रोजंदारीवर तो काम करतो. दुपारी शाळा सुटली की हॉटेलात जाऊन चहा बनवतो. ग्राहकांना देतो. एवढं सगळं करुन तो अभ्यास कधी करतो असा प्रश्न पडतो. कारण अभ्यास करण्याच्या वयात कपबश्यांच्या दुनियेतला आकाश शिंदेने दहावीत 90 टक्क्यांचा आकडा पार करत घवघवीत यश मिळवले.

अर्थात 90 टक्क्यांपर्यतचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. दहावीच्या वर्गात आकाशकडे फक्त दोन पुस्तकं होती. रात्री हॉटेलातून परत आल्यावर आकाश शाळेच्या वस्तिगृहात जायचा. इतर मुलांकडून पुस्तकं घेऊन रात्री अभ्यास करायचा. असा अभ्यास करून दहावीच्या परिक्षेत आकाशने 91.82 टक्के गुण मिळवले.

घरामध्ये आधीच पैशांची बोबं. त्यात वडिल व्यसनी. व्यसनी नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून आकाश अवघा दोन वर्षांचा असताना त्याच्या आईन आत्महत्या केली. तेव्हापासून आकाशला आजीनंच सांभाळलं.

आकाशला शाळेची फी भरण्यासाठी अनेक वेळा अडचणी आल्या. पण त्याची गुणवत्ता पाहून शाळेचे शिक्षक नेहमी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्याचंच फळ आज शाळेला मिळालं.

चांगले गुण मिळाल्यामुळे आकाश पाँलिटेक्नीकमधून सिव्हीलचा डिप्लोमा करणार आहे. डिप्लोमा झाल्यावर त्याला लगेच नोकरी मिळेल. आकाशला नोकरी मिळाली तर त्याच्या आजीचे कष्ट कमी करण्यासाठी मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *