लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

कळव्यातील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे स्वप्न दाखवून अत्याचार करणाऱ्या तरुणावर गुन्हा

दाखल करण्यात आला. याप्रकरणी अद्यापही त्या तरुणाला अटक केली नसल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.

कळवा येथे राहणाऱ्या इब्राम खान याने तरुणीशी फोनवरून ओळख वाढवली. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. याचदरम्यान, त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या राहत्या

घरी नालासोपारा आणि त्याच्या मूळ गावी, उत्तर प्रदेशात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून घडल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी इब्राम याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *