पेप्सिकोचा धोनीशी 11 वर्षे जुना करार रद्द –

आंतरराष्ट्रीय शीतपेय कंपनी पेप्सिको कंपनीने भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत असलेला 11 वर्षा जुना करार रद्द केला आहे. यावरुन धोनीचा जाहीरात क्षेत्रात कमी होणारा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
 
भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार असलेला धोनी आतापर्यंत पेप्सी कोला आणि लेज् चिप्सचा प्रमुख चेहरा होता. फोर्ब्स मासिकाच्या 2016 च्या यादीनुसार, जाहीरातींसाठी धोनीला सुमारे 2.7 कोटी डॉलरचे मानधन मिळत असून तो जगभरातील अॅथलीट्सपैकी सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे. त्याचे वेतन आणि व्यावसायिक कमाई 40 लाख डॉलर आहे.
 
पेप्सिकोने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, जाहीरातदार आपले उत्पादन साजरे करतात. जाहीरातीसाठी कल्पना महत्त्वाची आहे. आमचे उत्पादन साजरे करण्यासाठी आम्हाला एखाद्या सेलिब्रिटीची भूमिका महत्त्वाची असेल तर त्यादृष्टीने पुढे जाताना आम्हाला आनंदच होईल. 
 
तज्ज्ञांच्या मते विराट कोहलीच्या उदयामुळे धोनीचे महत्त्व कमी होत चालले आहे. जाहीरातदार धोनीऐवजी कोहलीसारख्या तरुण तडफदार ‘आयकॉन‘ला पसंती देऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, विराट कोहलीला जाहीरातींसाठी दर दिवसाला दोन कोटी रुपयांचे मानधन मिळते तर धोनीला दीड कोटी रुपये. वर्ष 2014 पर्यंत धोनीकडे सुमारे 18 ब्रँड्सच्या जाहीराती होत्या. प्रत्येक जाहीरातीमागे त्याला 10 ते 12 कोटी रुपये मिळत. आता खेळाडकडे असलेल्या जाहीरातींची संख्या अवघ्या दहावर आली आहे. 
 
विविध उत्पादने सादर करणाऱ्या पेप्सिकोने नेहमीच कलाकार आणि क्रीडापटूंशी जुने संबंध राहिले आहेत. धोनीशिवाय विराट कोहली, रणबीर कपूर आणि परिणिती चोप्रादेखील पेप्सिकोच्या जाहीरातींमध्ये झळकले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *