बेस्ट कर्मचा-यांचा मंगळवारी संपाचा इशारा

बेस्ट उपक्रमाच्या हद्दीत खासगी बसना प्रवाशांची ने-आण करण्याची परवानगी दिल्याने बेस्ट कर्मचा-यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करत बेस्ट बसचालकांनी मंगळवारी म्हणजेच ३० ऑगस्टला बंद पुकारण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नोकरदारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

मुंबई पालिका क्षेत्रात खासगी बसना परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला विरोध म्हणून मंगळवारी बेस्टच्या गाडय़ा रस्त्यावर उतरणार नाहीत. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल इतकीच महत्त्वाची भूमिका बेस्टच्या बस बजावतात. त्यामुळे मुंबईकरांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

शहरात कोणताही अनुचित घटना घडल्यास बेस्टच्या ज्यादा बसेस सोडण्याचे आदेश राज्य सरकार हक्काने देते. मात्र तरीही बेस्टला संपवण्याचा घाट घातला जात असेल तर मंगळवारी बेस्टही बंद ठेवू, असा इशारा कामगार सेनेने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *