अमेरिकेतील लॉस एन्जल्स शहरातील विमानतळावर रविवारी रात्री गोळीबार झाल्याने विमानतळ मोकळे करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या ए-4 टर्मिनलमध्ये गोळीबार झाला असून, या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. गोळीबार करणाऱ्याची ओळख पटली नसून, हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झालेले नाही.
विमानतळ प्रशासनाने ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रवाशांसाठी विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे.