दिल्ली येथील भालस्वा डेरी परिसरात छेडछाडी प्रकरणातून एका तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रकार घडला आहे. यात ही तरुणी ७० टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिसांनी घटनेतील मुख्य आरोपी अभिषेक, त्याचा भाऊ, तसेच त्याचे काका यांना अटक केली आहे. तर बाकीच्या इतर आरोपींचा शोध सरू आहे.
पोलिसांकडून अधिक माहिती अशी समजते आहे की, अभिषेक हा गेले काही महिने पिडीत तरुणीची छेडछाड करत होता. तो तिला माझं तुझ्यावर प्रेम आहे माझ्याशी लग्न करशील का अशी विचारणा करत असे. अनेक वेळा तर अभिषेकने तिचा विनय भंग करण्याचा देखील पप्रयत्न केला.
या तरुणीने आपली छेडछाड होत असल्याचे तिच्या भावाला सांगितली. त्यानंतर तिच्या भावाने अभिषेकला समज दिली आणि पुन्हा छेडछाड न करण्याचे बजावले. तरुणीच्या भावाने समज दिल्याने अभिषेकला राग आला. त्यातून त्याने बदल घायचे ठरवले. अभिषेकने त्याचे वडील, काका, भाऊ यांना या प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर या सर्वांनी पिडीत तरुणीच्या घरावर हाल केला. पहिला तिच्या भावाला जबर म्रहण करण्यात आली. आणि त्यानंतर त्यांचा मोर्चा तरुणीकडे वळला. अभिषेकने तरुणीवर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. यात ती ७० टक्के भाजली गेली. उपचारासाठी तिला प्रथम बाबू जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला एलएनजेपी रुग्णालयात हलवण्यात आले.