इटलीला बुधवारी (ता. 24) रात्री झालेल्या भूकंपानंतर मातीच्या ढिगाऱयाखाली अडकलेल्या चिमुकलीला 18 तासानंतर सुखरूप बाहेर काढण्यात बचाव दलाच्या पथकाला यश आले आहे.
इटलीमधील पेस्कारा देल टोरंटो गावाचे भूकंपात मोठे नुकसान झाले असून, गावातील 90 टक्के नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मातीच्या ढिगाऱयाखाली कोणी जिवंत आहे का याचा शोध सूर असताना जियुलिया या मुलीला जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. उपचारासाठी तिला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, इटलीला बुधवारी रात्री झालेल्या भूकंपातील बळींची संख्या 250 पर्यंत गेली आहे. इटलीतील अमार्टिस शहराला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला असून, येथे मदतकार्य वेगाने सुरू आहे. जवळपास निम्मे शहर भूकंपाने उद्ध्वस्त केल्याची प्रतिक्रिया या शहराच्या महापौरांनी दिली आहे. भूकंपाच्या पहिल्या धक्क्यानंतर अनेक हादरे बसल्याने घरांची मोठी पडझड झाली आहे. यापूर्वी इटलीला 2009 मध्ये भूकंपाचा मोठा धक्का बसून, त्यात तीनशे नागरिक मृत्यमुखी पडले होते.