नेपाळमध्ये बस अपघातात 20 जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये प्रवासी बस नदीमध्ये कोसळून झालेल्या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला असून 17 जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.

पोलिस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, छंदीभंजयांग गावाजवळून बस आज पहाटे जात होती. प्रवासादरम्यान बस पुलावरून 100 मिटर खाली त्रिशुली नदीत कोसळली. यावेळी झालेल्या अपघातात 20 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.

दरम्यान, बस नदीत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाल्यामुळे गावकऱयांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिस व ग्रामस्थांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *