सद्यस्थितीत 5 वर्षांखालील बालकांच्या आधार नोंदणीमध्ये बायोमेट्रिक माहिती, बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बाहुलींची प्रतिमा यांची नोंद घेतली जात नव्हती. मात्र यापुढे बाळ जन्मताच त्यांची आधार लिंकवर सर्व माहितीसह जन्मनोंदणी करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.
केंद्र शासनाच्यावतीने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाव्दारे 12 अंकी वैयक्तिक क्रमांक हा आधार क्रमांक म्हणून दिला जातो. हा क्रमांक देशात कोठेही ओळखीचा पुरावा म्हणून सादर केला जातो. प्रत्येक निवासी भारतीय नागरिकाची ओळख करून देऊ शकतो. यामध्ये नाव, जन्म दिनांक, लिंग आदींची माहिती असते. त्यामुळे वरील वस्तुस्थिती विचारात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील सर्व शासकीय व खासगी आरोग्य संस्थांमध्ये जन्म झालेल्या बालकांची आधार नोंदणी त्या त्या आरोग्य संस्थेच्या प्रमाणित यंत्रणाचालकांमार्फत आधार प्रणालीमध्ये नोंद करण्यात येणार आहे.
यामध्ये बालकाचे नाव हे मूल (बेबी) म्हणून संबोधले जाणार आहे. त्यानुसार आईचे नाव नोंदविल्यानंतर बालक हे त्यांच्या पालकांचे कितवे अपत्य आहे हे विचारात घेऊन त्या क्रमांकाचे मूल (बेबी) अशी नोंदणी आधार यंत्रणेमध्ये करण्यात येणार आहे. उदा. मातेचे नाव गीता असल्यास त्यांच्या दुसर्या अपत्याची आधार नोंदणी करावयाची असल्यास “गीता यांचे दुसरे मूल” अशी नोंदणी करण्यात येणार आहे आणि ही नाव नोंदणी हीींिं:/र्/ीळवरळ.र्सेीं.ळप या संकेतस्थळाला भेट देऊन अद्ययावत करता येणार आहे तसेच देशाचे नोंदणी महानिबंधक यांच्या कार्यालयातील नागरी नोंदणी यंत्रणा ही उहळश्रव एपीेश्राशपीं ङळींश उश्रळशपीं या आधार नोंदणी यंत्रणेशी संलग्न करण्यात येणार आहे.